कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
शेतकऱ्यांना त्वरित आणि सरसकट पीक विमा मिळावा यासाठी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सोलापूर -धुळे महामार्ग वरील येडशी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी पाटील म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीकडून करण्यात आले होते. परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांना विमा मंजूर केलेला नाही. मागील वर्षाच्या विम्याची राहिलेली रक्कम देखील अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेतकऱ्याकडून विमा कंपनीच्या प्रतिनिधीने घेतलेल्या पैशाबाबत फौजदारी खटले दाखल केलेले नाहीत. ही विमा कंपनी काळ्या यादीत टाकावी. सरसकट २० हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.
पीक विम्यासाठी येडशी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा रस्ता रोको
यावेळी आंदोलकांनी ५ डिसेंबरचा अल्टीमेटम कंपनीला दिला असून त्यानंतर मुंबई येथील कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. आंदोलनात बालाजी डोंगे, भारत शिंदे, इक्बाल पटेल ,प्रवीण शिंदे, तुषार वाघमारे, गुणवंत पवार, नामदेव कोकाटे, समाधान बराते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, व शेतकरी सहभागी झाले होते.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount