fbpx

राष्ट्रवादी काँग्रेसचे इंधन दरवाढीच्या निषेधार्त आंदोलन

कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद:आसिफ मुलाणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार घरगुती गॅस (Gas), इंधन दरवाढ आणि महागाईच्या निषेधार्त उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party ) वतीने आंदोलन करण्यात आले. देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. यामध्ये सर्वसामान्य शेतकरी, मजूर आणि कामगार होरपळून निघत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक अडचणीत असताना त्यात केंद्र सरकारने इंधन दरवाढ करून लोकांची लूट सुरू केली आहे असा आरोप करत उस्मानाबादमध्ये (Osmanabad) राष्ट्रवादीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले. राष्ट्रवादीचे पदाधिकारी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत इंधन दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जीवनराव गोरे, प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, संजय पाटील दुधगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *