बारावीत अकाउंट विषयात 100 पैकी 99 गुण मिळवून पुणे बोर्डात मिळाला दुसरा क्रमांक
मनसे शहर उपाध्यक्ष महेश पवार यांच्या हस्ते नेहा मानेचा जंगी सत्कार
कुतूहल न्यूज नेटवर्क-विजयकुमार मोटे
पंढरपूर : मार्च 2020 मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षामध्ये येथील विवेक वर्धिनी शाळेची नेहा सचिन माने या विद्यार्थीनिस अकाउंट विषयात 100 पैकी 99 मार्क मिळून तिचा पुणे विभागात दुसरा क्रमांक मिळाला आहे. त्याबद्दल या गुणवंत विध्यार्थीनीचा सत्कार मनसे पंढरपूर शहर उपाध्यक्ष महेश पवार यांच्या हस्ते शाल, मानाचा फेटा, पुस्पगुच्छ याबरोबरच आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी म्हणून तलवारही भेट देऊन सत्कार करण्यात आला.नेहा माने या विद्यार्थीनीस एकूण 85 टक्के गुण मिळून शाळेत तिसरा क्रमांक मिळाला आहे. तीच्या या यशाबद्दल अनेक मान्यवर मंडळीनी घरी जाऊन सत्कार केला आहे.

यावेळी सचिन माने, कोळी समाजाची रणरागिणी आणि समाजसेविका सौं दुर्गाताई सचिन माने, बबन माने, नातेपुते येथील भटक्या विमुक्त जाती जमाती बहुजन सामाजिक महिला महासंघ च्या जिल्हाध्यक्ष रेखाताई कांबळे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.