पांगरी : पांगरी ता बार्शी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात कृषी पंप वीज धोरण २०२० ची माहिती देण्यासाठी कार्याक्रमचे आयोजन केले. याप्रसंगी महावितरण कंपनीचे सहायक अभियंता प्रदीप करपे म्हणाले की, कृषीपंप शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्यास ५० टक्के अतिरिक्त सूट दिली जाईल तसेच जे शेतकरी तारेवर आकडे टाकून वीज वापरतात त्यांना ३० मी अंतरात असलेले कनेक्शन हे फक्त ३ हजार रुपयांत महावितरणाकडून जोडून देण्यात येईल, त्यासाठी सातबारावर विहीर किंवा बोअरवेलची नोंद असणे आवश्यक आहे.
याप्रसंगी शेतकरी विष्णू पवार यांनी ३६ हजार ३०० रुपये थकबाकी भरून या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी जयंत पाटील, जीवन देशमुख, विजय गरड, विलास लाडे, गणेश गोडसे, वीज मंडळाचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.