fbpx

कुतूहल परिवाराच्या वतीने पांगरी येथे नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

कुतूहल न्यूज नेटवर्क

पांगरी: पांगरी ता. बार्शी येथे नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा कुतूहल परिवाराच्या वतीने श्रीफळ, हार व शाल देवून सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी नगर परिषदेचे नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी, बार्शी पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले उपस्थित होते.

यावेळी ॲड. अनिल पाटील म्हणाले की गावासाठी जास्तीत जास्त निधी आणून, गावात विविध योजना राबवून गावाच्या विकासाठी प्रयत्न करणार. नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी म्हणाले की स्वच्छ व सुंदर गाव बनविण्यासाठी लागेल ती मदत या गावासाठी करेन. सभापती अनिल डिसले म्हणाले की शेती विषयक योजना तसेच घरकुल योजनासाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून देण्याचा प्रत्यन करणार.

यावेळी कुतूहल परिवाराचे अध्यक्ष प्रा.विलास जगदाळे, प्रा. संजीव बागडे, प्राचार्य शरद बसवंत, कौशल्या माळी,जेष्ठ पत्रकार तात्या बोधे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी विजय गरड, सुहास देशमुख, डॉ. विलास लाडे, शहाजी धस, रामलिंग गोडसे, पत्रकार इरशाद शेख, विष्णू पवार,जयंत पाटील,विजयकुमारमाळी, बाळासाहेब मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नवनाथ जगताप व आभार तात्या बोधे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *