कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य मनोज गादेकर यांचा श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ मळेगावच्या वतीने सत्कार करण्यात आला. विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून मळेगावमध्ये केलेल्या विविध सामाजिक कामामधून गावचे व महाविद्यालयाचे एक कौटुंबिक नाते तयार झाले आहे, त्यामुळे गावच्या विकासामध्ये महाविद्यालयाचे देखील योगदान आहे.
झाडबुके महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य मनोज गादेकर यांचा सत्कार
मळेगाव येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय श्रमसंस्कार शिबिरामध्ये राज्यातून आलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी भेट देऊन कामाचे कौतुक केले व गावच्या विकासाला गती मिळाली व या संधीचे गावाने देखील सोन करून घेतले व जलयुक्त शिवार अभियान मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने गाव दत्तक घेतले व खऱ्या अर्थाने मळेगाव हे राज्याच्या नकाशावर झळकले. त्यामुळे श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाला गाव विसरणे कठीण आहे म्हणून आज महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी मनोज गादेकर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक माळी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तात्यासाहेब घावटे, महाविद्यालयाचे ग्रंथालय विभागाचे सुरेश दराडे, मंडळाचे चंद्रकांत मुंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.