कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बार्शी तालुक्याच्या युवक तालुकाध्यक्षपदी नितीन शशिकांत कापसे यांची निवड करण्यात आली आहे. ते तालुक्यातील जवळगाव (नं.२) येथील रहीवासी आहेत. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी कापसे यांची निवड केली आहे.
कांदा उत्पादक संघटनेच्या बार्शी युवक तालुकाध्यक्षपदी नितिन कापसे यांची निवड
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभरातील कांदा उत्पादकांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात नितीन कापसे हे बार्शी तालुक्यातील कांदा उत्पादकांना संघटनेच्या नेतृत्वाखाली संघटित करून कांदा बियाणे, कांदा लागवड, कांदा विक्री याबाबत शेतकर्यांमध्ये जागृती निर्माण करून येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना कांदा पिकातून जास्तीत जास्त आर्थिक नफा कसा मिळेल यासाठी अविरतपणे काम करतील असा विश्वास संघटनेचे राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.