कुतूहल न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या बार्शी तालुका अध्यक्षपदी नितीन पाटील तर सचिवपदी इरशाद शेख
बार्शी : राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याची कार्यकारिणीची बैठक पिंपळनेर येथे पार पडली. या बैठकीमध्ये बार्शी तालुका अध्यक्षपदी नितीन पाटील तर सचिवपदी इरशाद शेख यांची एकामताने निवड करण्यात आली.
या बैठकीत नूतन पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे, हनुमंत जाधव – समाजसेवा संघ जिल्हा अध्यक्ष सोलापूर, श्रीनिवास बागडे -जिल्हा कार्याध्यक्ष समाजसेवा संघ सोलापूर, जावेद आतार- सोलापूर जिल्हा संघटक, भास्कर सोनवणे – अध्यक्ष समासेवा संघ माढा तालुका, प्रदीप माळी – संघटक बार्शी तालुका, गणेश वाघमोडे – उपाध्यक्ष उस्मानाबाद जिल्हा, निसार मुजावर -परांडा तालुका अध्यक्ष, राहुल धोका -प्रसिद्धी प्रमुख माढा तालुका , माढा तालुका कार्यकारणी सदस्य म्हणून बाळासाहेब कापरे, राहुल सुतार, शंभूराजे साठे – अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मुलन संघ सोलापूर जिल्हा सह संघटक, सिद्धेश्वर शिंदे माढा तालुका सह संघटक, महेश देशमुख आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष शफी शेख, जिल्हा संघटक अशोक खारे, माढा तालुका अध्यक्ष अंकुश आतकर, माढा उपाध्यक्ष अरबाज पठाण , माढा सचिव बाबाफरीद पठाण उपस्थित होते.