कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी येथे बिगर अत्यावश्यक सेवेची दुकाने यावेळेत राहतील सुरू
पांगरी : मा.जिल्हाधिकारी,सोलापूर यांच्या आदेशानुसार चालू लॉकडाऊन मध्ये बिगर अत्यावश्यक सेवेची दुकानांना सुट देण्यात आली आहे. ( पोलिस आयुक्तालय हद्द वगळून व प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्र (containment Zone) वगळून )
त्यानुसार मौजे पांगरी ता. बार्शी गावासाठी ग्रामस्तरीय कोरोना जनजागृती समितीने खालील प्रमाणे निर्णय घेतले आहेत.
- अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने/आस्थापना यामध्ये किराणा कृषीविषयक बाबी दूधसेवा सकाळी 7 ते संध्या 7 पर्यंत चालू राहतील.
- अत्यावश्यक सेवा मेडिकल दवाखाने ई, आरोग्य विषयक बाबी 24 तास चालू राहतील.
- बिगर अत्यावश्यक सेवा यामध्ये कपडे,स्टेशनरी,चप्पल दुकान,मोबाइल,फोटोग्राफी,स्वीटमार्ट,सोने,भांडी,हार्डवेअर,
लाँड्री ,पंक्चर दुकान,गॅरेज दुकान ई, दुकाने सकाळी 8 ते दुपारी 2 वाजे पर्यंत चालू राहतील, - यामध्ये सलुन, हाँटेल, रेस्टॉरंट,ढाबे तंबाखूपदार्थ विक्री करणारे पान टपरी दुकाने,चहाची दुकाने,बार ई. दुकाने पूर्णता बंद राहतील.
- चिकन,मासे,मटनाची दुकाने सकाळी 8 ते संध्या 6 पर्यंत चालू राहतील.
- गावातील मेडिकल, दवाखाने ई, आरोग्य बाबींची अस्थापणे वगळून सर्व दुकाने दर शनिवारी बंद राहतील.
- Social distancing चा काटेकोर पालन करणे तसेच मास्क चा किंवा रूमालाचा वापर करून घेण्याची सर्वस्वी जबाबदारी सर्व दुकानदार,अस्थापणाची राहील.
- वरील सर्व बाबी बाबत गावातील सर्व नागरिकांनी शासन निर्देशनुसार व वैद्यकीय सूचना प्रमाणे तोंडाला मास्क अथवा रुमाल वापरणे बंधनकारक आहे,तसेच प्रत्येक व्यक्तिनि social distancing राखावे .वरील प्रमाणे निर्णय घेण्यात आले असून यांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.