पांगरी : कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरीत वाहन चालक-मालक यांना बजावल्या नोटीस
बार्शी तालुक्यातील पांगरी येथे वाहन चालक व मालक यांना नोटीस बजावण्यात येत आहेत.
सध्या देशात कोरोना व्हायरस पार्श्वभूमीवर कलम 144 तसेच संचारबंदी लागू आहे.अत्यावश्यक सेवेची बाब म्हणून वाहने सुरु आहेत .परंतु वाहन धारकाचा प्रवास संवेदनशील भागातून होत आहे.त्यामुळे संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही.तसेच ग्रामस्थामध्ये असुरक्षितेची भावना वाढत आहे. यावर उपाय म्हणून चालकांनी गावातील संपर्क टाळून जि. प.शाळा येथे विलगीकरण कक्षामध्ये मुक्काम करून तेथील रजिस्टरवर वाहन चालकाचे नाव,प्रवासाचे ठिकाण,जाण्याचा दिनांक,वेळ व सही करावी,प्रवासामध्ये मास्क,सॅनिटायझरचा वापर करावा.या सूचनांचा भंग केल्यास कायद्यान्वये कारवाई केली जाईल,अश्या सूचना कोरोना दक्षता समितीचे अध्यक्ष तलाठी श्रीकांत शेळके व सचिव ग्रामसेवक संतोष माने यांनी या नोटीसव्दारे दिल्या.
Nice Progress