fbpx

शेळ्या राखायला घेऊन जात नाही म्हणून वृद्धास मारहाण

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी प्रतिनिधी : तु आमच्या शेळ्या का राखायला घेऊन जात नाही, तु माझ्या शेळ्या राखल्या नाहीस तर तुला जिवे ठार मारीण अशी धमकी देऊन एकाला लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील नारी येथे घडला.

सुरेश बाबु मोरे रा.नारी असे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
धोडीराम श्रीपती झोंबाडे,वय 60 वर्षे, रा. नारी,ता बार्शी,या वृद्धाने याबाबत पांगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीत म्हटले आहे ते गावातील निबांळकर यांचे किराणा दुकानात लहान मुलांना खाणेसाठी फरणास आणनेस गेले होते.त्यावेळी  गावातील सुरेश बाबु मोरे हा किराणा दुकानासमोर आला व म्हणाला की, तु माझ्या शेळ्या का राखायला घेवुन जात नाही. असे म्हणत त्यांने शिवीगाऴ करण्यास सुरूवात केली त्यावेऴी मी म्हणालो मला शिवीगाऴी करू नका असे म्हणताच हाताने व लाताबुक्याने माराहण करण्यास सुरूवात केली व त्यांने तेथे पडलेला लोखंडी पाईप घेवुन डावे पायाच्या पिढंरीवर मारल्याने  पिंढरीमधुन रक्त येत असताना मी मोठ्याने ओरडलो तेंव्हा तेथेच असलेले दिपक शिंदे,सुरेश निबांऴकर यांनी आमची भांडणे सोडवा सोडव केली.तेंव्हा मला म्हणाला की तु माझ्या शेळ्या नाही राखल्या तर तुला जिवे ठार मारीन असे म्हणुन निघुण गेला.पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *