fbpx

प्रार्थना बालग्राम उभारणीसाठी देशभक्त हरिनारायन सोनी ट्रस्टतर्फे एक लाखाची आर्थिक मदत

कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
प्रार्थना फाऊंडेशन ही संस्था सोलापूर मध्ये गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे. संस्थेच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील, वंचित, निराधार, भिक्षा मागणाऱ्या मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी प्रार्थना बालग्राम हा निवासी प्रकल्प चालवला जातो  तर अनाथ, निराधार, बेघर आजी आजोबांसाठी संस्थेच्या माध्यमातून वृद्धाश्रम चालवले जाते. सध्या हे प्रकल्प भाड्याच्या जागेत सुरू आहेत. संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीकोनातून मोरवंची येथे जागा घेऊन तिथे प्रार्थना बालग्राम व वृद्धाश्रम उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. समाजातील दानशूर व्यक्ती व संस्था या प्रकल्प उभारणीसाठी पुढे येत आहेत. कोणी वस्तू स्वरूपात तर कोणी आर्थिक स्वरूपात प्रकल्प उभारणीसाठी मदत करत आहे.

या प्रकल्प उभारणीसाठी देशभक्त हरिणारायन सोनी ट्रस्टतर्फे एक लाखाची रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. हरिनारायन सोनी हे स्वातंत्र्य सैनिक होते. हरिनारायन सोनी यांचा जन्म १९२० मध्ये सोलापूर येथे झाला. त्यांचा देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय सहभाग होता. त्यांनी १९४२ च्या चलेजाव चळवळीत सहभाग घेतला होता. हरिनारायनजींनी वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने तसेच उदात्त हेतूने आणि प्रामाणिकपणे समाजसेवा करणाऱ्या संस्थांना आणि व्यक्तींना आर्थिक मदत देण्याच्या हेतूने १९८० साली देशभक्त हरिनारायण सोनी ट्रस्टची स्थापना केली आणि त्या ट्रस्टला स्वतः ६० हजार रुपयांची पहिली देणगी दिली. आजही या ट्रस्टतर्फे उत्तम प्रकारे सामाजिक कार्य करणाऱ्या काही संस्थांना आणि व्यक्तींना आर्थिक स्वरूपात प्रेरणा निधी दिला जातो. या वर्षी प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रार्थना बालग्राम व वृद्धाश्रम उभारणीसाठी प्रेरणा निधी देण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नंदा करवा, सेक्रेटरी कौस्तुभ विश्वनाथन करवा, गोविंद तिरणगरी आदी उपस्थित होते.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *