fbpx

ऑपरेशन परिवर्तन होतेय सक्सेस: हातभट्टी दारू विक्री सोडून सुरु केली पान टपरी

कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या ऑपरेशन परिवर्तन मोहिमेला यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. दररोज हातभट्टीच्या धुरात काम करणारे हात आता चहा टपरी, पान टपरी, किराणा दुकान, शेळीपालन अन् शेती व्यवसायात गुंतल्याचे दिसून येत आहे.

पांगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी हातभट्टी विक्री करणाऱ्या कैलास जानराव (रा.पांगरी ता.बार्शी) या तरुणांचं समुपदेशन करुन त्याला या व्यवसायापासून परावृत्त केले असून तो आता त्याचा पूर्वीचा पान टपरी व्यवसाय करत आहे.

सपोनि सुधीर तोरडमल, पोलीस उपनिरीक्षक अमोल ननवरे, सतिश कोठावळे, पो.ना. गणेश दळवी, संदीप कवडे, अर्जून कापसे, जिंदास काकडे यांच्या टिमचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. यावेळी विलास लाडे, बाबासाहेब शिंदे, विशाल जानराव, इरशाद शेख, अनिल काकडे, फारूक सौदागर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *