fbpx

बाळराजे जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी: आशापुर्वक जगदंबा देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळराजे जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व आई जगदंबेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोना महामारी च्या संदर्भातील सर्व नियम व अटींचे पालन करत ही रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. बाळराजे जाधव यांनी आतापर्यंत सामाजिक कार्यामध्ये खूप मोठे योगदान केले आहे. गेल्या 21 वर्षांपासून आपल्या वाढदिवसानिमित्त आशा पूर्वक जगदंबा देवस्थान व बाळराजे युवा मंच यांच्या वतीने सतत रक्तदान शिबिराचे आयोजन करत आले आहेत. समाजातील गरजू व गरीब व्यक्तींना मोफत रक्त पुरवठा करण्याचे काम बाळराजे गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. बार्शी येथील भगवंत ब्लड बँक व कुर्डूवाडी येथील ब्लड बँकेच्या सहकार्याने यावेळी रक्ताचे संकलन करण्यात आले. जामगाव येथील युवकांनी मोठा प्रतिसाद देत रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला. प्रत्येक रक्तदात्यांना बाळराजे युवा मंच यांच्या वतीने एक भेट वस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जामगाव येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आशा पूर्वक जगदंबा देवस्थान कमिटीचे सर्व सदस्य, बाल राजे युवा मंचचे सदस्य व गावातील युवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *