कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी : बार्शी तालुक्यातील पांगरी येथे मोफत मूळव्याध तपासणी शिबीराचे आयोजन डॉ. सुधीर शिंदे यांचे जीवन क्लिनिक येथे रविवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
पांगरीत मोफत मूळव्याध तपासणी शिबीराचे आयोजन
मूळव्याध तपासणी मोफत असून गरीब रुग्णांचा ईलाज सुद्धा मोफत करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या मूळव्याधीवर ईलाज करण्यात येणार असून या शिबिराचा पांगरी परीसरातील रुग्णांनी फायदा घ्यावा – डॉ. सुधीर शिंदे, जीवन क्लिनिक पांगरी
या शिबाराचे आयोजन बार्शी येथील डॉ. विकास नागरगोजे यांचे धन्वंतरी पाईल्स क्लिनिक यांचे वतीने करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी नियमित पांगरीत डॉ. नागरगोजे रुग्णांच्या तपासणीसाठी हजर राहणार आहेत. शिबिरासाठी नांव नोंदणी ८६६९७३४६४८ या क्रमांकावर करावी.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount