कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
१ ऑगस्ट २०१९ रोजी कारी गावाचा समावेश उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये झाला. कारी गावापासून उस्मानाबादचे अंतर १८ किलोमीटर आहे. कारी गावातून उस्मानाबादला जाण्यासाठी बस सेवा बंद असल्यामुळे नागरिक, शाळकरी विद्यार्थी, वृद्ध महिला, दिव्यांगांना उपचारासाठी जावे लागते मात्र बस सेवेअभावी मोठी गैरसोय होत होती.
कारी मार्गे उस्मानाबाद बार्शी बस सेवा सुरू
या अनुषंगाने ग्रामपंचायत ने ही उस्मानाबाद येथील नियंत्रण कार्यालयात ग्रामसभेचा ठराव दिला होता. मागील महिन्यात उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे कारी गाव भेटीसाठी आले होते त्यावेळी अमोल जाधव यांनी ही बस सेवा सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. अखेर उस्मानाबाद आगाराकडून उस्मानाबाद, अंबेजवळगे ,कारी, पांगरी, बार्शी या मार्गे बस सेवा चालू करण्यात आली आहे. ही बस सेवा सुरू केल्याने प्रवाशांना नियमित पणे प्रवासाचा मार्ग सुखकर होणार आहे. यामुळे ग्रामस्थ विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount