कुतूहल न्यूज नेटवर्क
पंढरपूर शहर पोलीसांनी तब्बल २ लाख किंमतीचे २१ मोबाईल केले जप्त
पंढरपूर: पंढरपूर शहर पोलीसांनी चोरीस गेलेले मोबाईल व इतर गहाळ झालेले मोबाईल असा २ लाख १७ हजार किंमतीचे २१ मोबाईल जप्त केले.
ओमकार सतीश कळसकर हे स्टेशन रोड पंढरपूर येथे फुले खरेदी करण्यासाठी गेले असता त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाइल अज्ञात चोरट्यांनी चोरी केला होता. सदर फिर्यादीने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात याबद्दल फिर्याद दाखल केली होती. पोलीसांनी तपास केल्यानंतर सदर चोरी गेलेला मोबाईल कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात ट्रेसिंग होत असले बाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शिमोगा जिल्ह्यात जाऊन तपास केला असता चोरी गेलेला मोबाईल विधी संघर्ष ग्रस्त बालकाकडे मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला असून त्याच्याकडे चौकशी केली असता कर्नाटक राज्यातील शिमोगा व हवेली जिल्ह्यातून असे एकूण २० मोबाईल ताब्यात घेण्यात आले.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे , उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण पवार, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आर. जे. गाडेकर, पो हे कॉ शरद कदम, पो हे कॉ शोहेब पठाण, पो हे कॉ बिपिनचंद्र ढेरे, पो हे कॉ सुरज हेबाडे, पो हे कॉ राजेश गोसावी, पो हे कॉ सिद्धनाथ मोरे, पो हे कॉ इरफान शेख, पो हे कॉ गणेश पवार, पो हे कॉ सुजित जाधव, पो हे कॉ संजय गुटाळ, पो हे कॉ समाधान माने, पो हे कॉ सुनील बनसोडे, तसेच पो हे कॉ अन्वर आतार सायबर पोलिस ठाणे यांनी केली असून पुढील तपास पो ना पठाण करीत आहेत