कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी : जेष्ठ पत्रकार तात्या बोधे, (मो.9552648117)
कोरोना काळात पांगरी येथील कोरोना (कोव्हीड) केअर केंद्र, एक आदर्श सेवा केंद्र ठरले आहे. आरोग्य खात्याकडून रुग्णांची तपासणी झाल्यानंतर कोरोना बाधितांना केंद्रात दाखल करून घेतले जाते. पंधरा दिवस या केंद्रात ठेऊन योग्य ते उपचार केले जातात. बरे झाल्यानंतर रुग्णाला सन्मानाने सत्कार करून घरी पाठविले जाते. डॉक्टर, सिस्टर, ब्रदर व सेवक या सर्वाच्या मदतीने रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेऊन नित्यनियमाने व सातत्याने उपचार केले जातात.
पांगरी कोरोना केअर केंद्र, एक आदर्श सेवा केंद्र
या सर्व कामात सरकारी कर्मचारी तत्परतेने कार्यरत असतात त्याच बरोबर त्यांना मदत म्हणून पांगरी येथील भाजपचे बार्शी तालुका सरचिटणीस विलास लाडे हे कोरोना केंद्रात जातीने हजर असतात. कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्याकारणाने इतर नागरिक व नातेवाईक सहसा केंद्राकडे फिरकत नाहीत. दोनहात दुरराहूनच रुग्णांची चौकशी करतात असे असले तरी विलास लाडे हे माणुसकीच्या नात्याने कोरोना रुग्णांची जातीने संपर्क ठेऊन त्यांना योग्य ती मदत करतात. चहा, नाष्टा व जेवण इत्यादी सर्व गोष्टींची स्वतः काळजी घेतात. सकाळ संध्याकाळ केंद्रात हजर राहून सर्व तरेची मदत करतात. रुग्णांची सेवा करताना आपल्याला हा आजार होईल अशी थोडी सुद्धा शंका त्याच्या मनात येत नाही. रुग्णांमध्ये नैराश्य व उदासीनता येऊ देत नये म्हणून ते काळजी घेतात. रेडिओ-टेप, वर्तमानपत्र इ. साधने उपलब्ध करून देतात. सकाळी सर्व रुग्णांना एकत्र करून सामुदायिक प्रार्थना हि घेतात.
आजपर्यत दोनशेच्या वर बाधित रुग्ण बरे होऊन आपआपल्या घरी आनंदाने परतले आहेत. या त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे नागरिक कौतुक करून धन्यवाद देतात तसेच अधिकारी वर्ग हि त्यांची स्तुती करतात अशा या कोरोना योध्यास मानाचा मुजरा.