कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायतीत राऊत गटाची सरशी
पांगरी: बार्शी तालुक्यातील 15 सदस्य असणारी पांगरी ग्रामपंचायतीत 6 जागा बिनविरोध झाल्यामुळे 9 जागांची निवडणूक लागली होती व या 9 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात होते.
आमदार राजेंद्र राऊत गट, लोकनेते रघुनाथ ( दादा ) पाटील पॅनेलच्या उमेदवारांनी नऊच्या नऊ जागेवर विजय मिळवला आहे. एकूण 15 जागांपैकी 13 जागांवर राऊत गटाची सरशी झाली आहे.
विजयी उमेदवार- धस मिनिषा शहाजी,खवले धनंजय पंडित, गोडसे गणेश उत्रेश्वर, बगाडे भास्कर जगन्नाथ, जाधव सतीश रामचंद्र, लाडे सुरेखा विलास, नारायणकर प्रमिला सोमनाथ, काकडे हिराबाई रमेश, मोरे रेणुका बाळासाहेब.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार- माळी शैलजा राजकुमार, बगाडे मैनाबाई लिंबराज, गाढवे सुवर्णा संजय, कुंभार शुभांगी श्रीकांत, देशमुख रामभाऊ भिमराव, बागवान रियाज दस्तगीर.