पांगरी : सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे करिता वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने दर शनिवार रविवार या दिवशी सर्व हॉटेल व दुकाने बंद राहतील असे कायदेशीर केलेले असताना या आदेशाचे उल्लंघन करून तोंडाला मास्क न लावता हॉटेल चालू ठेवल्याने हॉटेल चालकांवर पांगरी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेली दिलेले अधिक माहिती अशी की, दि. 3 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा च्या सुमारास अमजत काशीम शेख (वय 36 वर्षे) रा पांगरी ता बार्शी यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे करिता वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने दर शनिवार रविवार या दिवशी सर्व हॉटेल व दुकाने बंद राहतील असे कायदेशीर केलेले असताना या आदेशाचे उल्लंघन करून तोंडाला मास्क न लावता हॉटेल न्यू दरबार हे चालू ठेवून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा मानवी जीवित व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून संसर्ग पसरविण्याची घातक कृत्य करून शासनाने व जिल्हाधिकारी यांचे आदेश उल्लंघन केले आहे, म्हणून पोलीस अंमलदार अर्जुन कापसे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक डाके करत आहेत.