कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरीत मटका घेणाऱ्यावर कारवाई
पांगरी प्रतिनिधी : बार्शी शहरातून पांगरी येथे जाऊन मटका घेणाऱ्या एकास पांगरी पोलिसांनी रंगेहाथ पकडले.गणेश सुभाष सुपेकर वय. 27 वर्षे रा सुभाष नगर बार्शी असे याप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे.
सपोनि सुधीर तोरडमल यांच्या आदेशाने हवालदार मनोज जाधव,वाघमारे हे अवैध धंद्यावर कार्यवाही करत पांगरी गावात असताना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,एक इसम पांगरी ता. बार्शी गावातील एस. टी. बस थांबाजवऴ चोरून कल्याण नावाचा मटका घेत आहे. एस. टी. बस थांबाजवऴ एक पुरूष इसम खाली मानघालुन कागदावर काहीतरी आकडेमोड करित असताना दिसुन आला त्याचा जुगार गुन्ह्याचे कामी संशय आल्याने त्यास गराडा घालुन जागीच पकडले. त्यांच्या जवळून मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पो.काॅ. सुरेश बिरकले यांच्या फिर्यादीवरून पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.