कुतूहल न्यूज नेटवर्क
इलेक्ट्रीक मोटार केबल चोरी करणाऱ्या चोरास पांगरी पोलीसांनी केली अटक
पांगरी : पांगरी पोलीस ठाण्यात १०७५ फुट लांबीची आतमध्ये तांबे असलेली व २६८७५ रुपये किमतीची इलेक्ट्रिक केबल चोरीस गेलेबाबत गुन्हा दाखल झाला होता.याच गुन्हामध्ये एकास पांगरी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दिनांक २० डिसेंबर रोजी पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, सदर गुन्हयामध्ये २६,८७५ रू चे १०७५ फुट लांबीची आतमध्ये तांबे असलेली इलेक्ट्रीक केबल चोरीस गेलेबाबत गुन्हा दाखल झाला होता.सदर तपास पोहेकॉ सतीश कोठावळे हे करत होते.पोलिसांनी गोपनीय बातमीरामार्फत बातमी काढून आबा राजाराम धायगुडे वय २९, रा शिंगोली ता जि उस्मानाबाद यास ताब्यात घेवून तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा कबूल केले.त्यास कोर्टात समोर हजर केले असता कोर्टाने त्याला ३ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली.सदर संशयित आरोपीकडून गुन्ह्यासाठी वापलेले मोटार सायकल, एक केबल कटर व चोरी केलेल्या केबल मधील जाळून बाजूला काढलेली २६८७५ रु.ची तांब्याची तार जप्त करण्यात आली आहे.सदर आरोपीने अजून कोठे कोठे चोरी केली आहे याचा तपास व त्याच्या ईतर साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उप विभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर, उप विभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, पोहेकॉ सतीश कोठावळे, पोहेकॉ मनोज भोसले, पोना कुणाल पाटील, पोकॉ सुरेश बिरकेल, पोकॉ सुनिल बोदमवाड, पोकॉ उमेश कोळी, पोकॉ संदिप कवडे, चापोकॉ गणेश घुले व होमगार्ड लक्ष्मण गवळी, आकाश देवकर यांनी पार पाडली आहे.