कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: मळेगाव (ता. बार्शी) येथे अवैध दारू विक्रेत्यावर पोलिसांनी छापे मारून कारवाई केली. याप्रकरणी एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध देशी दारू विक्री; १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
मळेगाव येथील चौकात स्टँडवर देशी दारूची अवैध विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी छापा मारला असता एक जण राँयल इन फिल्ड बुलेटवर समोर एका पांढऱ्या रंगाची प्लँस्टिकची पिशवी घेवून दारू विक्री करताना आढळला. शिवराज हुलगाप्पा धोत्रे (वय २८, रा. मळेगाव, ता. बार्शी) असे पकडलेल्या दारू विक्रेत्याचे नाव असून त्याच्या ताब्यातून ५४० रुपये किमतीच्या ९ देशी दारूच्या बाटल्या, १ लाख १० हजार रुपये किमतीची सिलव्हर रंगाची दोन चाकी राँयल इन फिल्ड बुलेट असा एकूण १ लाख १० हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी फिर्याद पोकाँ उमेश कोळी यांनी दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount