पुणे (दयानंद गौडगांव): उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटील यांच्या काकीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांनी हर्षवर्धन यांची सांत्वनपर भेट घेतली. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जातात. (Ajit Pawar Son Parth Pawar meets BJP Leader Harshvardhan Patil Daughter Ankita Patil)
राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात भेट, राजकीय वर्तुळात चर्चा
हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयुरसिंह पाटील यांच्या मातोश्री अनुराधा (माई) अरुणराव पाटील यांचे निधन झाले. 18 मार्च 2021 रोजी अल्पशा आजाराने अनुराधा पाटील यांची प्राणज्योत मालवली. या पार्श्वभूमीवर पार्थ अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील, मयुरसिंह पाटील आणि पाटील कुटुंबीयांची भेट घेतली.पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करुन त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासह कन्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील आणि पाटील कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.