कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे प्रतिनिधी: माहेर संस्थेला २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संस्थेच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन यांचा ढोल ताशांच्या गजरात स्वागत करून रोप्य महोत्सव साजरा करण्यात आला.
पेरणे फाटा- माहेर संस्थेचा रोप्य महोत्सव उत्साहात साजरा
पेरणे फाटा झोपडट्टीवासीयांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पेरणे फाटा येथे आदर्श गंमत शाळा, अभ्यासिका वर्ग, ज्ञानदिप विकास केंद्र, संगणक वर्ग, महिला व पुरुष बचत गट हे माहेरचे काम गेल्या २५ वर्षापासून या भागात सुरू आहे.
ही संस्था विधवा महिला, काच-पत्रा वेचणाऱ्या महिला, दिव्यांग तसेच सामाजिक कामात अग्रेसर असते. यावेळी कोरोना काळात संस्थेने राशन किट, मास्क सेनिटायजर अंडी वाटप केली. रुग्णांवर औषध उपचार केले. ३२१ लोकांना समुपदेशन करून लस देण्यात आली.
माहेरचा रोप्य महोत्सव महिलांनी आपल्या घरासोमर सडा व रांगोळी काढून, वस्तीमध्ये तोरण बांधून, सर्वधर्म समभाव प्रार्थना करून केक कापून साजरा केला. माहेरच्या हिरा बेगम मुल्ला, प्रकाश कोठावळे, हरीश अवचर, माया शेळके यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी मंगल वामने, ग्रामपंचायत सदस्य मालती मलके, सारिका काळे, अलिषा पठाण, तबस्सुम शेख, सुनिता निर्मळ, सामाजिक कार्यकर्ते प्रतिक काळे, सागर कसबे, अनिता जाधव, अनिता गायकवाड, गायत्री निर्मळ, अतुल शेळके उपस्थित होते.