fbpx

पुणे पाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनाचा उद्रेक; शहरातील सर्व उद्याने ३१ मार्चपर्यंत पूर्णत: बंद ठेवण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

कुतूहल न्यूज नेटवर्क

चिंचवड (दयानंद गौडगांव) : पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जाताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज ५०० ते ६०० रूग्णांची भर पडत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पालिका प्रशासनाने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. यादरम्यान शहरातील सर्व उद्याने दि.३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात कोविड -१९ आजाराचा वाढता प्रादुर्भाव व बाधित रुग्णांची वाढ लक्षात घेता महानगरपालिका क्षेत्रातील सर्व उद्याने (Garden) याबाबत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आले आहे.

१. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व उद्याने (Garden) दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्णतः बंद राहतील.

२. पिंपरी चिंत्रवड महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण/सेवा वगळता दि.१ मार्च २०२१ पासून रात्री ११:०० ते सकाळी ०६:०० यावेळेत संचार करण्यास प्रतिबंध असेल, मात्र यामधून जीवनावश्यक वस्तूंचा (दुध, भाजीपाला, फळे इ.) पुरवठा करणारे, वृत्तपत्र सेवा व अत्यावश्यक सेवा पुरवणारे आस्थापना/व्यक्तींना व त्यांच्या वाहनांना वगळण्यात येत आहे. तसेच ज्या उद्योगांचे शिफ्टमध्ये कामकाज चालते अशा संबधित आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना व त्यांची ने- आण करणाऱ्या वाहनांना सदर आदेशामधून वगळण्यात येत आहे.

३. संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश/मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

४. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यापुर्वी निर्गमित केलेले आदेश/मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.

सदर आदेश दि.०९.०३.२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील असे आयुक्त राजेश पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *