कुतूहल न्यूज नेटवर्क
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना मध्ये (घरकुल) पिंपरी (आर) ला विशेष प्राधान्य देण्यात यावे – प्रा. पाटील
बार्शी : पिंपरी (आर) ता . बार्शी या गावामध्ये जवळपास सत्तर टक्के नागरिक अल्पसंख्याक, आर्थिक दुर्बल घटकातील आहेत. गेल्या चार ते पाच वर्षां पासून पिंपरीतील नागरिकांना या योजेनेअंतर्गत फारसा सकारात्मक लाभ मिळाला नाही. गावामध्ये अपंग, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक यांना विशेष प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी प्रा. शरद पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संबधित प्रती मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत.