fbpx

‘फादर्स डे’ चे औचित्य साधत शावळ येथे वृक्षारोपण

कुतूहल न्यूज नेटवर्क
अक्कलकोट : दयानंद गौडगांव 
अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथे फादर्स डे चे औचित्य साधत डॉ. मेंटन फाउंडेशन यांच्या सौजन्याने व कै. भीमराव तुळशीराम भोसले यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सुंदर भोसले यांनी केले होते. यावेळी गावचे सरपंच सोमलिंग तामदंडी, ग्रामसेवक संतोष म्हेत्रे, सदस्य संजय भोसले, सदगुरू महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या अध्यक्षा रुपाली गणेश पाटील, शिवबा फाऊंडेशन संस्थापक सिद्धेश्वर सर्जेराव सुरवसे, जिजाई कन्स्ट्रक्शन शावळ अध्यक्ष भीमा गोरख सुरवसे, श्रीमंत भोसले, नितीन चव्हाण, मनमोहन भोसले, प्रेमनाथ भोसले, परमेश्वर भोसले, समर्थ भोसले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *