कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: बार्शी तालुक्यातील पांगरी येथे अटल आनंदवन घन प्रकल्पांतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, करंज, पळस, लिंब, भावा, सीताफळ, आंबा, लिंम्बू, कडीपत्ता, तुळस, मोगरा, बोर, चाफा, गुलाब, चिंच आदी वृक्षांचा समावेश आहे.
पांगरीत अटल आनंदवन घन प्रकल्पांतर्गत वृक्ष लागवड
यावेळी बार्शी पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, वन परिक्षेत्र अधिकारी एच.बी. कोकाटे, वनपरिमंडळ अधिकारी जे.जे. खोंदे, माजी सरपंच तात्या बोधे, डॉ. विलास लाडे, पत्रकार इर्शाद शेख, नियतक्षेत्र अधिकारी एम.पी. शेळके, वनसेवक ठोंबरेसह आदी मान्यवर उपस्थित होते.
जगात सर्वच क्षेत्रामध्ये प्रयोगशीलतेतून नवनवीन तंत्राचा विकास होत आहे. उपलब्ध कमी क्षेत्रामध्ये जास्त वृक्षांचे आवरण आणि घन वन अर्थात डेन्स फॉरेस्ट निर्माण करण्याचा प्रयोग जपानमध्ये मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केला. भारतामध्ये बंगलोर, हैद्राबाद इत्यादी ठिकाणी हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हयातील आनंदवन येथे महारोगी सेवा समितीच्या जमिनीवर हा प्रकल्प उत्तमरित्या विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे यश लक्षात घेवून राज्यात अटल आनंदवन घन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहे.