कुतूहल न्यूज नेटवर्क
ख़बरदार ! एकत्र येऊन गप्पा मारणाऱ्या सहाजणांवर पोलिसांची कारवाई
पांगरी : नारी ता बार्शी येथे दि. 22 रोजी सायं. 6:30 वा.पोलिस पेट्रोलिंग करत असताना येडेश्वरी हॉटेल समोर पत्रा शेडमध्ये काही लोक गप्पा मारत बसल्याचे दिसले.पोलीस त्यांच्याकडे जात असताना त्यांना पोलिसांची चाहूल लागलेने ते लोक पळून गेले. पोलिसांनी हॉटेल मालक शामराव गणपती बदाले रा नारी ता बार्शी यास ताब्यात घेऊन इतर लोकांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे मुकिंदा मेटे रा महागाव ता बार्शी,सौदाअप्पा डोईफोडे ,दशरथ त्रिंबक शिंदे,आण्णा घावटे ,भारत भीमराव कुरुळे सर्व रा नारी ता बार्शी असे असल्याचे सांगितले.या सहाजनांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सार्वजनिक सुरक्षीतता,मानवी जीवीत व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल हे माहीत असताना देखील तोंडाला मास्क न लावता व कोणत्याही प्रकारची दक्षता घेतली नव्हती. यांनी मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाचा भंग केल्यामुळे त्यांचे विरुद्ध पो.काँ. सुनिल बोधमवाड यांनी फिर्याद दिली आहे.