fbpx

मोटार सायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कुतूहल न्यूज नेटवर्क

पांगरी प्रतिनिधी दि.19 : मोटार सायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर (ग्रा) व पांगरी पोलीसांनी आवळल्या मुसक्या.स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीण यांचे पथक जिल्ह्यातील पाहिजे फरारी आरोंपीचा शोध घेत असतांना मोहोळ येथे बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याप्रमाणे त्यांना दोन इसमांवर संशय आल्याने त्यांनी संशयित आरोपी सचिन सुभाष शिंदे, वय २४ वर्ष रा. उपळे (दु) व अजय सुनिल भोसले वय २३ वर्षे रा. धनेगाव ता. तुळजापुर यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी खोटी व उडवा उंडवीची उत्तरे दिल्याने पोलीसांचा संशय बळावला.त्यांना ताब्यात घेवुन अधिकचा तपास केला असता त्यांचेकडे चार मोटार सायकल व १० पावत्या नसलेले चोरीचे मोबाईल मिळुन आले.त्यांचे जवळील मोटार सायकलबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास केला असता ती ममदापुर ता. बार्शी जि. सोलापुर येथील असल्याची उघडकिस आली आहे. त्यानंतर पांगरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुधीर तोरडमल यांनी पांगरी पोलीस ठाणेस दाखल गुन्ह्यामध्ये वरील दोन संशयित आरोपीना वर्ग करून घेवुन अटक करून त्यांचेकडे तपास केला असता आरोपींनी व त्यांचे इतर साथीदार यांनी मिळुन विविध ठिकाणावरून मोटार सायकल व मोबाईल चोरी केली असल्याचे सांगितले.

त्याप्रमाणे पोहेको चौगुले व पोना मुंढे यांनी उपळे दुमाळा येथुन तुषार जयदेव मगर वय, २० वर्षे यास ताब्यात घेवुन चौकशी केली. असता,त्यांने नारी येथील देखील एक मोटार सायकल साथीदारांच्या मदतीने चोरल्याचे सांगत आहे. त्यास देखील सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असुन त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टानी एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली.

सदर संशयित आरोपींकडुन एकुण ४ मोटार सायकली व १० मोबाईल हॅन्डसेट चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने जप्त करण्यात आले. अशा पध्दतीने स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीण व पांगरी पोलीस ठाणे यांनी कौशल्यपुर्ण संयुक्त कारवाई करून ०३ संशयित आरोपींना अटक करून त्यांचेकडुन चोरीच्या ४ मोटार सायकल व १० मोबाईल हस्तगत केले आहेत.

सदर संशयित आरोपीने आणखी कोठे कोठे चोरी केली आहे याचा अधिकचा तपास व त्यांच्या इतर साथीदार यांचा शोध पांगरी पोलीस ठाणे करीत आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते सोलापुर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अतुल झेंडे सोलापुर ग्रामीण, मा. पोलीस उप अधिकक्षक (गृह) श्री. अरूण सावंत, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. अभिजीत धाराशिवकर बार्शी उप विभाग बार्शी यांचे मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेलचे पोहेकॉ पारेकर व पोना शिंदे तसेच पांगरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुधीर तोरडमल व त्यांची टिम पोहेकॉ चौघुले, पोहेकॉ कोठावळे, पोना मुंडे, पोकॉ बोदमवाड, पोकॉ कोळी,पोकॉ बिरकले, पोकॉ धोत्रे व पोकॉ घुले यांनी पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *