कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी : बार्शी तालुक्यातील पांगरी येथील श्री स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडून स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी प्रा. डॉ. किरण झरकर, प्रा. अशोक सावळे, प्रा. विलास जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसट, वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. अनिल पाटील, अशोक सावळे, दिलिप सुरवसे, धनंजय जगदाळे, विजय गरड, प्रा. विशाल गरड, डॉ. विलास लाडे, तात्या बोधे आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडून पांगरीच्या वाचनालयाला पुस्तके भेट
ही स्पर्धा परीक्षेची पुस्तके अनेक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतील. दातृत्वाची आजही समाजात वानवा नसून गावाचे सौभाग्य वाचनालये आहेत असे प्रतिपादन प्रा. विलास जगदाळे यांनी आपल्या अध्यक्षकीय भाषणात केले.
एक कोटी विद्यार्थ्यांना एक लाख कौशल्याशी जोडण्यासाठी माझे काम सुरू असून पांगरी गाव त्यासाठी दत्तक घेतले आहे. स्किल बुकच्या सर्व संकल्पना पांगरीत राबवून उद्योग धंद्यातून तरूणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन स्किल बुकचे निर्माते किरण झरकर यांनी केले.
तरूणांच्या हातात पुस्तके देण्याचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. तरुण पिढी घडविण्यासाठी सर्व ते सहकार्य केले जाईल. पोलीस ठाण्यातील मैदानाचा वापर गावातील तरूणांनी करावा असे सपोनि सुधीर तोरडमल यांनी सांगितले.
प्रास्ताविकात ॲड. अनिल पाटील यांनी वाचनालय चांगल्या पद्धतीने चालवल्यामुळे आदर्श ग्रंथालयाचा पुरस्कार प्राप्त झाला. अनेक तरूण या वाचनालयामुळे घडले असे सांगितले. प्रा.विशाल गरड यांनी पुस्तक आणि वाचनाने दुसऱ्यांदा माणसाचा जन्म होतो. चांगली पुस्तके आपल्या मुलांना वाचायला द्या असे सांगितले.
याप्रसंगी प्रा. अशोक सावळे, शहाजी धस, अनिल खुणे, तात्या बोधे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सतिश जाधव, मिठु काकडे, रियाज बागवान, गणेश गोडसे, हणुमंत बगाडे, विजयकुमार माळी, शरद देशमुख, सोमनाथ नारायणकर, बाळासाहेब मोरे, राहुल गायकवाड, विष्णु पवार, पत्रकार गणेश गोडसे, संजय बोकेफोडे, बाबासाहेब शिंदे, सचिन ठोंबरे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन पत्रकार इर्शाद शेख यांनी तर आभार ॲड. अभिजित पाटील यांनी मानले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount