fbpx

चोरांना पाहून पळ काढणारे पोलिस अखेर निलंबित

कुतूहल न्यूज नेटवर्क

चिंचवड प्रतिनिधी: पुण्यातील औंध परिसरात मुद्देमाल चोरी करत असलेल्या चोरट्यांना न पकडता तिथून पळ काढणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. औंध येथील सोसायटीत सोमवारी पहाटे घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे. पोलीस हवालदार प्रवीण रमेश गोरे आणि पोलीस नाईक अनिल दत्तू अवघडे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, औंध येथील शैलेश टॉवर या सोसायटीत शिरलेल्या चोरांची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली होती. माहिती मिळाल्यानंतर दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखलही झाले. परंतु त्यांनी या चोरांना पकडण्याचा प्रयत्नही केला नाही. उलट त्यातील एक कर्मचारी चोरांना पाहून पळून गेला. याप्रकरणी या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य करीत असताना केलेला निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा आणि भित्रेपणामुळे पोलिस खात्याची जनमानसातील प्रतिमा मलिन करणारी असल्यामुळे या दोघांनाही शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *