सोलापूर : पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी हे दैनंदिन कर्तव्यामध्ये नेहमी व्यस्त असतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबीयां करता वेळ देता येत नाही तसेच त्यांना सण आणि त्यांचे घरातील आनंदाचे कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे त्यांच्या मध्ये तणाव निर्माण होतो. ज्यामुळे त्यांचे कामकाजावर परिणाम होऊ शकतो म्हणून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीसांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना किमान त्यांचा वाढदिवस त्यांचे कुटुंबीयासमवेत साजरा करता यावा याकरिता त्यांना निश्चित सुट्टी देण्याचा निर्णय हा पोलीस अधीक्षक यांनी घेतला आहे. तसेच त्यांना वाढदिवशाचे शुभेच्छापत्र देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. या निर्णयामुळे कामकाज तणावरहित होईल आणि पोलीसांना त्यांचे कुटुंबीय यांचेसोबत एक आनंदाने दिवस साजरा करता येईल. या निर्णयामुळे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे कौतुक होत आहे.