कुतूहल न्यूज नेटवर्क
समाजाशी नाळ जोडलेला शिक्षक प्रदीप मदने
लेखक – श्री.चंद्रकांत हरीबा कांबळे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुगळगाव वाडी. ता. उमरगा
उमरगा : समाजात अशी काही मोजकीच माणसे आपणास पाहावयास मिळतात कि, ज्यांच्या रक्तात स्वार्थ पहावयास मिळतनाही. त्यांना फक्त इतरांचे हित जोपासण्यातच धन्यता वाटते. असे भाग्यवान माणसेदेखील थोडीच असतात. आपले सर्वस्व पणाला लावणे हे त्यांचे जीवनातील अंतिम ध्येय असते. पेशाने शिक्षक असलेले उमरगा तालुक्यातील प्रसिद्ध येणेगुर नगरीचे सुपुत्र श्री. प्रदीप गोपाळ मदने यांचे ब्रिद” हाती घ्याल ते तडीस न्याल”. हे समाजसेवेसाठी वाहिलेले उमरगा तालुक्यातील एक पुष्प आहेत. एखादे कार्य हाती घेतले की ते पूर्णत्वास नेणे हा त्यांचा गुणविशेष आहे. अशा या महान व्यक्तिमत्त्वाविषयी माझ्या मनात निर्माण झालेली मनोगत मी यात व्यक्त करीत आहे.

उमरगा तालुक्यातील एक कर्मनिष्ठ, समाज प्रिय , शिक्षक प्रिय, कलाप्रिय, सांस्कृतिक प्रेमी, समाजाचा आदर्शवत अशा गुणसंपन्न व्यक्तिमत्त्वाविषयी मला दोन शब्द लिहिण्याचा योग मिळाला त्यातच मी माझे भाग्य समजतो. समाजातील तळागाळातील शासकीय, निमशासकीय प्रसंगी स्वतःच्या खिशातून मदत करणारे गुरुजी म्हणजे श्री. मदने गुरुजी.गुरुजींच्या रक्तात केवळ समाजाला आपण कसे उपयोगी ठरतो याचा ते विचार करणारे . संपूर्ण जग लॉकडाऊन ने थंड असताना गोरगरिबाची चूल पेठवण्यासाठी त्यांच्या वस्तीवर जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे कीट पोहोचवणारे, वीट भट्टी वरील मजुरांना रोग प्रतिकार शक्ती वाढावी,त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्रत्यक्षात भट्टीवर जाऊन आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करणारे,ज्यांची कुवत रुग्णाला दवाखान्यापर्यंत यायची नाही त्यांना प्रसंगी ॲम्बुलन्स उपलब्ध करून देणारे, त्याला जीवनदान देणारे श्री. गुरुजी होय. “एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ” या संतांच्या उक्तीप्रमाणे गुरुजी सतत दुसऱ्याला देण्यातच धन्यता मानतात.
स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता येणेगुर फेस्टिवलच्या माध्यमातून तसेच कैलास वासी विश्वनाथराव गायकवाड बहुउद्देशीय सामाजिक संस्था येणेगुर यांच्या माध्यमातून अहोरात्र स्वतःला झोकून दिले आज पूर्ण तालुका उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. मनात द्वेष, आकस, राग न ठेवता समोरच्या व्यक्तीला आपले करणे हा त्यांचा आणखी एक व्यक्ती गुणविशेष होय. इतरांच्या टीकेला जराही न जुमानणारे, त्यांचा आदर करणारे असेही प्रिय मदने गुरुजी होय. गुरुजींचे कार्य केवळ शिक्षक न राहता त्यांच्या अडचणी व त्यांच्या न्याय हक्कासाठी घडणारे श्री मदने सर नेहमीच अग्रेसर असतात. येणेगुर फेस्टिवल ते संयोजक असून त्यांनी उमरगा परिसरातील लोकांच्या मनोरंजनाबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रत्येक वर्षी येणेगुर फेस्टिवल राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करून ग्रामीण भागातील प्रतिभावान कलाकार शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. या कार्यक्रमातून ग्रामीण भागातील लोकांना या कार्यक्रमातून प्रतिभावान कलाकारांची प्रत्यक्षात दर्शन घडते आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरित होण्याची घरी मिळतात. एक उत्कृष्ट कलेचा नमुना म्हणून या स्पर्धेकडे अख्ख्या राज्याचे लक्ष असते. एक स्वच्छ प्रतिमा, साधा स्वभाव, उच्च विचार, संयम या गुणांची खाण म्हणजे आदरणीय श्री .मदने सर. सर्वसामान्यांना न्याय, व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य गुरुजींकडून होत आहे. गुरुजींचे शैक्षणिक, सामाजिक, संघटनात्मक कार्य उल्लेखनीय असेच आहे.
त्यांचे आणखी एक उल्लेखनीय कार्य म्हणजे येणेगुर नगरीमध्ये असलेले ‘अंतिम निर्णय’ हे संपर्क कार्यालय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धापनदिनानिमित्त सदरील कार्यालयाचे ‘आरोग्य सहायता कक्षात ‘रूपांतरित करण्यात आले. या कक्षात नागरिकांचे ऑक्सि मीटर पल्स व टेंपरेचर, आर्सेनिक अल्बम थर्टी गोळ्या व मास्क दिले जातात. दिनांक 3 /8/2020 रोजी सातशे जणांनी आपली तपासणी केली आहे. शासन, ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागास मदत करणे हा त्यामागचा उद्देश आहे. ही सर्व सामाजिक कामे ते निशुल्क व आवडीने करतात.विद्यार्थी शिक्षक यांना प्रेरित करण्याचे कार्य गुरुजींकडून सतत केले जाते. प्रत्येक वर्षी येणेगुर फेस्टिवल द्वारे सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान या येणेगुर फेस्टिवल मधून केला जातो. या फेस्टिवल मध्ये हे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रातील अधिकारी, साहित्यिक, विविध विषयावरील व्याख्याने, कवी संमेलन, शेती विषयक माहिती, सामाजिक माहिती देऊन समाज प्रबोधन केले जाते. सरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते पुरस्कार देणारे शिक्षक आहेत घेणारे नाहीत त्यांच्या हातून आतापर्यंत अनेकांना पुरस्कार दिले गेले आहेत. ते स्वतः पुरस्कार घेणारे नाहीत.