कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे: पेरणे ता. हवेली येथील प्रतीक संतोष काळे यांची लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडीच्या हवेली तालुकाध्यक्ष पदी निवड झाली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे, कोअर कमटी प्रदेश अध्यक्ष कैलास खंदारे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडीच्या हवेली तालुकाध्यक्षपदी प्रतीक काळे
संघटनेच्या पुणे जिल्हा आढावा बैठकीचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी अनेक युवा कार्यकर्त्यांनी संघटनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्हा व तालुका स्तरावरील पद नियुक्त्या करण्यात आल्या. याप्रसंगी अदीकराव ओव्हाळ व संजय फाजगे, शिरुर नगरपरिषदचे नगरसेवक दादाभाऊ लोखंडे, संदीप नेटके, विशाल जोगदंड, गणेश शिंदे, विजय सकट, नागेश शेलार, दत्ता साळवे, महिला आघाडीच्या हवेली तालुकाध्यक्ष सारिका काळे, फुलाबाई थोरात, वनिता शेलार तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यापुढील काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या, प्रवेशाच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करण्याबरोबरच त्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असून विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी स्पर्धा परीक्षांकडे लक्ष देण्याचे आवाहन यावेळी प्रतीक काळे यांनी विद्यार्थ्यांना केले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount