fbpx

स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या सेंटरवर सामाजिक सुरक्षा दलाचा छापा : पाच मुलींची सुटका

कुतूहल न्यूज नेटवर्क

निगडी प्रतिनिधी : निगडी येथील इन्सपिरीया माॅलमध्ये अमारा स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या स्पा सेंटरवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. याप्रकरणी स्पा सेंटरची पन्नास वर्षीय महिला व शान मेहमुद खान ( वय ३६, रा. प्राधिकरण, पुणे) यांच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाला निगडी येथील इन्सपिरिया मॉलमध्ये अमारा स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.याबाबत पथकाने बनावट गिऱ्हाईक पाठवून खात्री केली. खात्री पटल्यानंतर पथकाने सोमवारी (दि.१४) सायंकाळी साडेचारच्या दरम्यान स्पा सेंटरवर छापा टाकला. दरम्यान,स्पा सेंटर चालक महिला व मॅनेजरवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पाच पीडित मुलींची सुटका केली आहे. आरोपींकडून जवळपास ५७ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *