कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी (आसिफ मुलाणी): उस्मानाबाद तालुक्यातील आंबेजवळगा ,घाटंग्री , कौडगाव या परिसरात कोरोना ने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव व कोरोना रुग्णांची वाढती संख्या याला आळा घालण्याच्या उद्देशाने गावच्या सीमा बंद करण्यात आल्या असून 30 एप्रिल पासून पुढील आदेशा पर्यंत उपविभागीय महसूल अधिकारी योगेश खरमाटे यांनी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.
आंबेजवळगा, घाटंग्री, कौडगावात 5 मे पर्यंत जनता कर्फ्यू
या गावात बाहेरील व्यक्तीस जाण्यास तसेच गावातील व्यक्तीस बाहेर जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. ही गावे कंटेनमेंट घेऊन जाहीर करून 3 कि. मी चा परिसर रेड झोन जाहीर करण्यात आला असून 7 कि. मी. परिसर हा बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.