दयानंद गौडगांव:कुतूहल न्यूज नेटवर्क
पुण्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक ; २८ फेब्रुवारी पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
चिंचवड प्रतिनिधी : मागील आठवड्या पासून पुण्यात कोरोना रूग्णांची सतत वाढ होताना दिसत आहेत. त्यामुळे पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड मधील शाळा २८ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्याबरोबरच जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.
पुणे महानगरपालिका क्षेत्रासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांसंदर्भात माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, शहरात रात्री ११ ते पहाटे ६ दरम्यान संचारबंदी लागू राहील. पुण्यामध्ये हॉटेल सुरू ठेवण्यासाठी रात्री ११ पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. तसेच शहरातील कोचिंग क्लासेस बंद राहतील. मात्र अभ्यासिका सुरू राहतील. तसेच महाविद्यालयेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच लग्नसोहळ्यासाठी केवळ २०० जणांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.