fbpx

पार्टीसाठी किती जणांना परवानगी आहे’ विचारणाऱ्याला पुणे पोलिसांचे भन्नाट उत्तर

कुतूहल न्यूज नेटवर्क

पुणे (दयानंद गौडगांव): राज्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच विवाह सोहळ्याला 50 जणांची उपस्थिती बंधनकारक आहे. अशातच एका पठ्ठ्याचा वाढदिवस १ मे ला असल्याने त्याने पुणे पोलिसांना ट्विटरवरुन एक प्रश्न विचारलाय. त्या प्रश्नाला पुणे पोलिसांनीही भन्नाट उत्तर दिलंय.

काय आहे प्रश्न ?

‘सर 1 मेला माझा वाढदिवस आहे. मित्र पार्टी दे म्हणत आहेत, तर बर्थडे पार्टीसाठी किती जणांना परवानगी आहे, आणि ती मिळवण्यासाठी काय करावं लागेल.’ असा प्रश्न शिवानंद दसरवार यांनी ट्विट करत पुणे पोलिसांना विचारला आहे.

पुणे पोलिसांचे भन्नाट उत्तर

पुणे पोलिसांनी या ट्विटला रिप्लाय करत लिहिलं आहे की, ‘तुमच्या मित्रांना लॉकडाऊनच्या काळात बाहेर जायचे असेल तर त्यांना आमचा नंबर द्या. आम्ही त्यांना “पार्टी”साठी आमंत्रित करू. वाढदिवसाच्या ‘ऍडव्हान्स’ मध्ये शुभेच्छा. घरीच राहा, सुरक्षित राहा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *