fbpx

उदयनराजेंचा इशारा ;… तर स्वतः पुणे-सातारा महामार्ग जेसीबीनं उखडणार

“हल्ली लोकांना खासदार आमदार कोण आहे त्यापेक्षा विकास महत्त्वाचा”

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुणे सातारा महामार्गावरून सरकारला इशारा दिला आहे. रस्ता खराब झाल्यानं प्रवाशांची हेळसांड होत असून, अनेकांना जीवही गमवावे लागले आहेत,” अशी चिंता व्यक्त करत उदयनराजेंनी जेसीबीनं रस्ता उखडून टाकू, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

वाई पालिकेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उदयनराजेंनी वाईला बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे मुख्याधिकारी विद्या पोळ नगरसेविका रुपाली वनारसे विकास शिंदे.ऍड दत्ता बनकर आदी उपस्थित होते. “पुणे सातारा महामार्ग खराब झाल्याने रस्ते विकास महामंडळाला संबंधित ठेकेदाराचे काम काढून घेण्याबाबत कळविले आहे. रस्ता खराब झाल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. तर अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. जर लवकरच रस्ता दुरुस्त झाला नाही तर स्वतः जेसीबी घेऊन रस्ता उघडून टाकणार आहे,” असा संतप्त इशारा उदयनराजे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *