fbpx

Puno Advance : पुणे टेक सिटीत सर्वात मोठा मनोरंजन पार्क सुरू

कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे: टेक सिटी असलेल्या पुणे शहरात पहिल्यांदाच पुनो अँडव्हान्स हे अत्याधुनिक हायटेक गेमिंग डेस्टीनेशन मनोरंजन पार्क  सुरू होत आहे. जेथे आबालवृद्ध आजवर न अनुभवलेला इनडोअर अँडव्हेंचर गेम्स आणि अ‍ॅक्टिव्हिटीचा आनंद अनुभवू शकतात. शहरातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असलेल्या फिनिक्स मार्केट सिटी येथे पुनो अँडव्हान्सचे उद्घाटन  झाले आहे. सुमारे ३० हजार चौ.मी. असलेल्या या पुनो अँडव्हान्स मध्ये ग्राहक अत्याधुनिक व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीवर आधारित पुनो अँडव्हान्स मध्ये  तुमचा रोमांचक मनोरंजनाचा थरार पुरेपूर वाढवण्यासाठी विविध घटक उपलब्ध आहेत. पुनो अँडव्हान्स अँड ट्रैम्पोलिनचा पहिला प्रकल्प जयपूर शहरात सुरू झालेला असून आज पुणेकरांच्या सेवेत दाखल झालेला आहे.

Augmented Bowling

पुनो अँडव्हान्समध्ये प्रथमच तुम्हाला Augmented Bowling लेनचा अनुभव घेता येणार आहे. जिथे तुम्ही एका नवीन स्तरावर अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पारंपारिक गोलंदाजीचा अनुभव सहजपणे घेवू शकता.

Glow in the Dark Trampoline

पुण्यातील पहिल्या Glow in the Dark Trampoline येथे तुम्हाला प्रत्येक जंप सोबत एक वेगळ्या प्रकारचे थ्रील अनुभवायला मिळणार आहे.

Arcade game &  V R game

पुनो अँडव्हान्स येथे मनोरंजनाबरोबरच पुणे शहरातील सर्वात मोठे क्लासिक आर्केड गेम्स झोन देखील आहे, जेथे आपण आपले बालपण पुन्हा अनुभवू शकता. पारंपरीक गेम सोबतच येथे V R Game सुद्धा आहेत. जेथे आपण एक वेगळ्या स्तरावरचा गेम खेळण्याचा अनुभव घेवू शकता.

VEX – FREE ROAM VR

व्हर्च्युअल रियालीटीचा अधिक अनुभव पुनो अँडव्हान्स येथील भारताच्या पहिल्या VEX – FREE ROAM VR येथे घेता येईल. येथे पुणेकरांना आपल्या मोबाईल स्क्रीनद्वारे युद्धावर आधारीत रोमाहर्षक विविध गेम्स खेळता येतील.

PUNO JUNIOR लहानग्यांसाठी वेगळा विभाग

पुनो अँडव्हान्स मध्ये केवळ मोठ्यांसाठीच नाही तर लहान मुलांसाठी देखील PUNO JUNIOR असा वेगळा विभाग आहे. ज्यामध्ये चिमुकल्यांना खेळण्याचा मनमुराद आनंद घेता येईल. यातून लहान मुलांच्या प्रतिभेलाही चालना मिळणार आहे.

Play, Eat & Drink  खेळा, खा आणि प्या

पुनोअँडव्हान्स हे खेळा, खा आणि प्या या मंत्रांवर आधारित आहे. त्यानुसार येथे एक शानदार स्पोर्ट्स लाउंज आणि बार आहे, ज्याची संकल्पना POTS & PLATES च्या नावाने येथे आहे. त्यामुळे तुम्ही एकाचवेळी येथे खाऊ ही शकता आणि खेळू ही शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *