fbpx

Hathras Gangrape : “सत्य लपवण्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासन अमानवीय प्रकार करतंय”

कुतूहल न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. दिल्लीत सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी पीडितेचा मृत्यू झाला. यामुळे देशभर संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हाथरस प्रकरणावरून पुन्हा एकदा योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सत्य लपवण्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासन अमानवीय प्रकार करतंय” असं म्हणत राहुल यांनी टीका केली आहे. तसेच यासोबत एक व्हिडीओही ट्विट केला आहे. 

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून वृत्तवाहिन्यांशी बोलणाऱ्या पीडितेच्या नातेवाईकांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच “उत्तर प्रदेश प्रशासन सत्य लपवण्यासाठी अमानवीय प्रकार करतंय. ना आम्हाला, ना माध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांशी भेटू दिलं. त्याचबरोबर त्यांनाही बाहेर येऊ दिलं जात नाही. पीडितेच्या कुटुंबीयांना मारहाण आणि त्यांच्यासोबत असभ्य वर्तन केलं जात आहे. कोणताही भारतीय अशा वागणुकीचं समर्थन करू शकत नाही” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1311978551332073474/video/1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *