आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी,कारी परिसरात परतीच्या पावसाने विजेच्या कडकडाटसह घातला धुमाकूळ
कारी दि.11 : पांगरी,कारी पंचकृषित परतीच्या पावसाने विजांच्या कडकडाटसह दमदार हजेरी लावली.याअगोदरच झालेल्या पावसामुळे शेतात सर्वत्र पाणी साठलेले होते आणि काल परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतीला तळ्याचे रूप धारण केले आहे.शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरुवात केली आहे पावसामुळे काढलेले सोयाबीन एकत्र गोळा करून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे या पावसामुळे काही शेतकऱ्यांचे लागवड केलेले कांद्याचे रोपे पावसामुळे वाहून गेले आहे.