कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दोन तीन दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागली आहेत. काही ठिकाणी पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे उभ्या पिकात पावसाचे पाणी साचले आहे. अगोदर सोयाबीनचे भाव कमी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असताना त्यात काढणीला आलेले सोयाबीन पावसाच्या पाण्यात आहे. गेल्या महिन्यात सोयाबीनच्या दराने दहा हजारी पार केली होती. त्यामुळे काढणीचे भावही एकरी चार ते पाच हजार झाले. भाव वाढल्याने यंदा सोयाबीन मधून चांगला नफा मिळेल अशी आशा होती. अशी आशा असतानाच दर ही खाली कोसळले. सोयाबीन पिकाचे पावसामुळे नुकसान झाले त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र पाऊस; पिके पाण्यात
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount