कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
मागील आठ ते दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. कारीसह परिसरातील अनेक गावांमध्ये रविवारी पावसाने हजेरी लावली. हा पाऊस ज्वारी, मका, गहू या पिकांना जीवदान मिळाले आहे. परंतु द्राक्ष उत्पादक शेतकरी मात्र या पावसामुळे चिंतेत पडला आहे. कारी परिसरात द्राक्ष बागेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागावर दावणी, भुरी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच द्राक्षावर रोग पडला आहे. यामुळे सकाळ- संध्याकाळ महागड्या बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत असल्याने उत्पादन खर्च वाढणार आहे. मात्र आणखी जर असाच पाऊस आणि ढगाळ वातावरण राहिले तर द्राक्ष उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कारी परिसरात पावसाची हजेरी, द्राक्ष बागा संकटात
बदलत्या वातावरणामुळे कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. काही दिवसापासून रोगट वातावरण तयार होत असून याचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसत आहे-संजीत डोके, द्राक्ष बागायतदार कारी
रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा तीन वेळेस कीटकनाशक, बुरशी नाशकांची फवारणी करावी लागत आहे.-सुरज हाजगुडे, द्राक्ष बागायतदार कारी
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount