कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे: पुणे शहराध्यक्षपदी राजाभाऊ कांबळे यांची तर राज्य सचिवपदी अनिल सोनवणे यांची निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात म्हणाले, विधानपरिषद आमदारकीसाठी नक्कीच आरपीआय खरात पक्षाचा विचार होईल.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (खरात) पुणे शहराध्यक्षपदी राजाभाऊ कांबळे
येणाऱ्या निवडणूका पाहता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षात संघटनात्मक फेरबदल करण्यात आला आहे. पक्षाचे संघटन अधिक मजबूत होण्यासाठी पुणे शहर अध्यक्षपदी राजाभाऊ कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष २०१४ पासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा मित्र पक्ष आहे. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजितदादा पवार याच्या नेतृत्वाखाली सत्तेत आला आहे. त्यामूळे आमच्या पक्षाचा विधानपरिषद आमदारकीसाठी नक्कीच विचार होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
मुंबई येथील इंदू मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकरात लवकर व्हावे, भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभ परिसराचे सुशोभिकरण करुन या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा. आणि गेल्या सरकारमध्ये असताना त्यावेळेस अजितदादा पवार यांनी महात्मा फुले महामंडळाला १०० कोटी रुपये, आण्णाभाऊ साठे महामंडळाला १०० कोटी रुपये निधी जाहीर केला होता. तो निधी तात्काळ देण्यात यावा. ही मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.