कुतूहल न्यूज नेटवर्क
राजीव गांधी आश्रम शाळा पांगरी येथे स्वातंत्र्य दिन साजरा
पांगरी : राजीव गांधी केंद्रीय आश्रम शाळा पांगरी येथे 74 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दहावी मध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी स्वप्नाली गुणवंत घुले व सुलभा जगताप यांंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सूत्रसंचालन लुंगारे मॅडम यांनी केले व शिवाजी बगाडे यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम मोजक्याच लोकात सोशल डिस्टंसिंग ठेवून व तोंडाला मास्क लावूूून पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल जगतात, संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजीव बगाडे, उपाध्यक्षा सुलभा जगताप, मुख्याध्यापिका किरण बगाडे, उपमुख्याध्यापक रामकृष्ण मुळे, प्रवेशिका राऊत मॅडम, अधीक्षक वाहिद शेख सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.