पांगरी प्रतिनिधि
राजीव गांधी शाळेने पटकावला तालुकास्तरीय चॅम्पियन चषक
पांगरी : नेहरू युवा केंद्र सोलापुर सलग्न नंदनवन बहुउद्देशीय सामाजिक संस्था काटेगांव ता.बार्शी या संस्थेच्यावतीने विविध तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत तालुक्यातून अनेक शाळा व संघ सहभागी झाले होते ,या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा युवा समन्वयक आजितकुमार यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेत राजीव गांधी केंद्रीय निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा,पांगरी या शाळेने उत्कृष्ट कामगिरी करत विविध खेळात यश प्राप्त केले.१७ वर्षे वयोगटातील खो-खो स्पर्धेत मुलींनी प्रथम,तर मुलांनी व्दितीय क्रमांक पटकावला ,१४ वर्षे वयोगटातील खो-खो स्पर्धेत मुलींनी तृतीय क्रमांक पटकावला तसेच रोहिणी मुळे हिने वैयक्तिक १०० मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
या यशस्वी खेळाडूंना पी एम.लोंढे ,ए.ए.शिंदे आणि एस. सी.ठोंगे यांनी मार्गदर्शन केले.सर्व यशस्वी खेळाडूचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजीव बगाडे,उपाध्यक्षा सुलभा जगताप,सचिव तथा मुख्याध्यापिका किरण बगाडे,उपमुख्याध्यापक रामकृष्ण मुळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले,या यशाबद्दल पंचक्रोशीत कौतुक होत आहे.