fbpx

अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय सल्लागार समिती सदस्यपदी राजकुमार झिंगाडे यांची निवड

दयानंद गौडगांव: कुतूहल न्यूज नेटवर्क
अक्कलकोट : अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालय तहसीलदार नामनिर्देशित सल्लागार समिती सदस्यपदी अनुलोम अक्कलकोटचे जनसेवक राजकुमार झिंगाडे यांची निवड करण्यात आली आहे.

अनुलोमच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबत शासनाच्या योजने अंतर्गत हजारो लाभार्थ्यांना लाभ मिळवुन दिले आहे.व अनेक शासकीय योजनेचे लाभ मिळवून देण्याचे काम राजकुमार झिंगाडे यांनी केले आहे. माजी मुख्यमंत्री तथा सध्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी सामाजिक क्षेत्रात अनेक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य या योजने अंतर्गत हजारो लाभार्थ्यांना लाभ मिळवुन दिले आहे व सामान्य गरीब लोकांना न्याय देण्याबरोबर शासकीय लाभ मिळवून देण्याचे सतत प्रयत्न केलेले आहे.

यासोबत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी,उपनगराध्यक्ष यशवंत तात्या धोंगडे, कमलाकर सोनकांबळे, निजप्पा गायकवाड, सुनील सावंत, संतोष पोमाजी आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *